डोंबिवली ; खांबाळपाडा येथील बेकायदा दुकानांच्या शेडवर महापालिकेची कारवाई
डोंबिवली दि.०२ – खांबाळपाडा रोडवरील एमआयडीसीच्या पाईपलाईनवर बेकायदेशीर रित्या उभारण्यात आलेल्या मार्बल दुकान, गॅरेज, ढाबे, टाईल्स दुकान, हॉटेल्स, बांबूची दुकानांच्या शेड आणि त्याबाहेरील समान अशा सुमारे १५० दुकानांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी कारवाई केली. रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या दुकाने आणि शेडवरही कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.डोंबिवली पूर्वेकडील खांबाळपाडा रोडवरील एमआयडीसीच्या पाईपलाईनवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या मार्बल दुकान, गॅरेज, ढाबे, टाईल्स दुकानाच्या बाहेरील शेडवर `फ` प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली.
हेही वाचा :- डोंबिवलीतील रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे द्या ..
त्यावेळी बाधित नागरीकांनी महापालिकेच्या कारवाईस जोरदार विरोध केला. परंतु महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या विरोधास न जुमानता बेकायदा बांधकावर कारवाई केली. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धडक देत कारवाई केल्याच्या विरोधात जोरदार धिंगाणा घातला. कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही असे ग्रामस्थांनी केला. याबाबत `फ` प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मार्बल दुकान, हॉटेल, गैरेज आणि ढाबे अशी सुमारे १५० दुकानांच्या बेकायदेशीररित्या शेडवर कारवाई करण्यात आली. हे सर्व दुकाने बेकायदेशीररित्या उभारण्यात असल्याने त्यांना नोटीसा बाजवण्याचा सबंध येत नाही, कारवाई केल्यामुळे अधिकाऱ्यांवर पैशांचा खोटा आरोप बाधित नागरिक करीत आहेत. भविष्यात या बेकायदेशीर रित्या उभारण्यात आलेल्या सर्व गाळ्यांवर ही कारवाई केली जाईल असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने नागरिक कार्यालयात घुसल्याने सुरक्षततेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.