डोंबिवली ; महावितरण च्या महिला कर्मचाऱ्यास मारहाण

डोंबिवली दि.०१ – डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या सरिता ठाकरे या महावितरणचे वीज देयक न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज पुरवठा खंडित करण्याचे काम करतात. उमेश नगर परिसरात गणपती सुखी इमारतीमध्ये राहणार्‍या नंदा केणे यांच्या घरी मंगळवारी सायंकाळी गेलेल्या ठाकरे यांनी त्यांना थकीत बिल भरण्यास सांगितले.

हेही वाचा :- कल्याणात घरफोडी

मात्र त्यास नकार दिल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या ठाकरे यांना केणे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या नंदा केणे यांच्याविरुद्ध विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email