डोंबिवली ; इंटरनेटची तक्रार असल्याचे सांगत घरात घुसून लॅपटॉप लंपास
डोंबिवली दि.०७ – डोंबिवली पश्चिमेकडील आरबीआय कॉलनी येथील आशीर्वाद बिल्डिंग मध्ये राहणारे सूर्यकांत शिवगावकर ( ७२ ) हे बुधवारी दुपारी घरात एकटे असताना एक अज्ञात इसम त्यांच्या घरी आला. तुमची इंटरनेट ची तक्रार असून बिघाड दुरुस्त करण्यासाठी आल्याची बतवणी केली. या अज्ञात भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळ इंटरनेट तपासण्यासाठी लॅपटॉप मागितला.
हेही वाचा :- डोंबिवली ; नोकराणी मालकाला सुमारे १३ लाखाना गंडवले
त्यानंतर त्याने तेथून काढता पाय घेतला. यावेळी शिवगावकर यांनी त्याला लॅपटॉप बद्दल विचारले असता त्याने त्यांना लॅपटॉप शोकेस मध्ये ठेवल्याचे सांगितले. हा इसम निघून गेल्या नंतर त्यांना लॅपटॉप चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.