डोंबिवली ; यूएलसी कोट्यातून घराचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

डोंबिवली दि.०८ – सरकारच्या यूएलसी कोट्यातून कमी सवलतीत घरे मिळवून देण्याचे आमिष दखवत दोन जणांनी एका महिलेसह दोन इस्माना तब्बल १३ लाख ९१ हजार ४०० रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात प्रकाश सकपाळ व संतोष भोसले विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. डोंबिवली पूर्व मानपाडा रोड शंखेश्वर नगर सोसायटी मध्ये राहणाऱ्या वैशाली गोसावी यांची २०१५ साली कल्याण येथे राहणा-या प्रकाश सकपाळ व संतोष भोसले या दोघांची ओळख झाली होती.

हेही वाचा :- कल्याण ; गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या मित्राला चाकू व लोखंडी रोड ने हल्ला

या ओळखीचा गैरफायदा घेत प्रकाश सकपाळ व संतोष भोसले या दोघा भामट्यानी वैशाली याना सरकारच्या यूएलसी कोट्यातून कमी सवलतीत घरे मिळवून देण्याचे आमिष दखवत त्यांच्याकडून चेक व रोख च्या माध्यमातून एकूण ५ लाख ६१ हजार रुपये उकळले वैशाली यांच्यासह योगेश्वर चिंदरकर यांच्याकडून ४ लाख ५५ हजार ४०० रुपये, तर महेंद्र चोरघे यांच्याकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले. इतकेच नव्हे तर प्रकाश सकपाळ व संतोष भोसले या दोघा भामट्यानी लेखी करार देखील केला होता मात्र बराच कालावधी लोटूनही घराबाबात काहीच हालचाल नसल्याने तसेच पैसे परत करण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने या तिघांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी प्रकाश सकपाळ व संतोष भोसले या दोघा भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email