डोंबिवली ; केडीएमटीचे ६ तासात अडीच लाख उत्पन्न विशेष सेवेमुळे प्रवाश्यांनी मानले आभार …

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१९ – कल्याण रेल्वे पत्रीपूल हटविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ६ तासांचा मेगाब्लॉग घेतला होता. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीने डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानक अशी विशेष सेवा सकाळपासून सुरु केली होती. रिक्षाचालकांनी मेगाब्लॉग फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली होती. मात्र केडीएमटीने भाडे न करता विशेष सेवा म्हणून डोंबिवली ते कल्याण रेल्वे स्थानकासाठी ४० बसेस सुरु केल्या. बसमधून प्रवास करण्यासाठी बाजीप्रभू चौकात प्रवाश्यांनी रांगा लावल्या होत्या.एसटी महामंडळाने यावेळी केडीएमटीला मदत म्हणून चार एसटी कल्याण ते डोंबिवली आणि डोंबिवली तर कल्याण मार्गावर सुरु ठेवल्या होत्या. ६ तासात केडीएमटी सुमारे अडीच लाख उत्पन्न मिळाले असून चांगली सेवा दिल्याने प्रवाश्यांनी केडीएमटीचे आभार मानले.

पालिकेच्या परिवहन सेवेने रविवारी सकाळी साडे आठ वाजल्यापासून कल्याण ते डोंबिवली आणि डोंबिवली ते कल्याण मार्गावर बससेवा सुरु केली होती. शहरातील सर्व मार्गावरील काही बसेस या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. केडीएमटीच्या सुमारे ४० बसेससच्या या मार्गावर १२८ फेऱ्या झाल्या. तर एसटी महामंडळाच्या ४ एसटीप्रवाश्यांच्या सोयीसाठी या मार्गावर धावत होत्या. एसटीच्या या मार्गावर १९ फेऱ्या झाल्या. नेहमीप्रमाणे डोंबिवली ते कल्याण आणि कल्याण ते डोंबिवली असे प्रवासी भाडे १० रुपये आहे. बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात बस थांब्याजवळ लांब लांब रांगा लावल्या होत्या.

हेही वाचा :- हॉलिवूड गायक जस्टिन बीबर विवाहीत… सोशल मीडियावर पत्नीबाबत खुलासा

प्रवाश्यांना चांगली सेवा मिळावी म्हणून परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, सदस्य संतोष चव्हाण,संजय राणे,प्रसाद माळी यांसह शाखाप्रमुख संदीप नाईक, शिवसैनिक सुयोग चवाटे, भाजप वॉड अध्यक्ष आशितोष तिवारी, दिपेश घोले, सिद्धेश शिवाळी,सुनील गुप्ता, परिवहन उपक्रम वाहतूक निरीक्षक श्याम पोस्टे,मदतनीस गोरखपूरी,यासह कंट्रोलर संदीप भोईर आणि मंगेश साळवी या दोन मदतनीस आदींनी मेहनत घेतली. यावेळी काही प्रवाश्यांशी परिवहन सदस्यांनी संवाद सांधून परिवहनच्या सेवेविषयी माहिती घेतली असता प्रवाश्यांनी केडीएमटीच्या सेवेबद्दल आभार मानले.

तर सदस्य संतोष चव्हाण म्हणाले, शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार कल्याणजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी परिवहन समितीतील शिवसेना सदस्याशी चर्चा केली. रविवारी प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजीप्रभू चौकात प्रवाश्यांना बससेवा मिळण्यासाठी प्रत्यक्ष जा असे निर्देश दिले. त्यानुसार आम्ही सदर ठिकाणी प्रवाश्यांना सेवा देण्याचे काम करत होतो. प्रथमच केडीएमटीचे उत्कृष्ट नियोजन दिसले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email