डोंबिवली ; रिक्षा चालक व दुचाकीस्वराच्या भांडणात त्रिकुटाने दुचाकी केली लंपास
डोंबिवली दि.०५ – डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा येथील साई दर्शन सोसायटी मध्ये रहाणारे शिवकुमार चौरसिया गत सोमवारी दुचाकी ने कामावर निघाले सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ते सोनार पाडा येथील बस स्तंड जवळ पोहचले असताना एका रिक्षाने त्यांना धडक दिली त्यामुळे चौरसिया व सदर रिक्षा चालकात वाद सुरु झाला. यावेळी रिक्षात बसलेल्या तिघा प्रवाशांपैकी एका प्रवाशाने तुमच्या मुळे अपघात झाला व माझा मोबाईल गहाळ झाला असे सांगत.
हेही वाचा :- कल्याण ; मायलेकीचा पोलीस स्थानकासमोर धिंगाणा
चौरसिया यांना फोन लावण्यास सांगितले. मात्र कुणी फोन उचलला नाही याच दरम्यान इतर दोन प्रवाशांनी त्यांची स्कुटी घेवून तेथून पळ काढला. या प्रकरणी चौरसिया यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विकास महाकाल या इस्मा सह त्याच्या अज्ञात दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. रिक्षा चालक व दुचाकीस्वराच्या भांडणात त्रिकुटाने दुचाकी लंपास केली.