डोंबिवली ; फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रविक्री १७० प्राणघात हत्यारांसह दुकानदार अटकेत

डोंबिवली दि.१६ – फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली खुलेआम शस्त्रास्त्रांची विक्री सुरू असल्याचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटला यश आले आहे. या युनिटने डोंबिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका दुकानावर अचानक धाड टाकून दुकानदाराच्या मुसक्या आवळल्या. या दुकानातून तब्बल 170 प्राणघातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत.

धनंजय अनंत कुलकर्णी (49) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव असून कल्याण कोर्टात मंगळवारी हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयाने कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे. हा दुकानदार टिळकनगर मधील न्यू दिपज्योत सोसायटीत राहत असून त्याचे मानपाडा रोडला महावीर नगरातील अरिहांत बिल्डिंगच्या तळमजल्यावर तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे दुकान आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकाला खंडणीची आणि जीवे ठार मारण्याची धमकी..

या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघात हत्यारांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस गिऱ्हाईक पाठवून क्राईम ब्रँचने प्रथम खात्री केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास अचानक धाड टाकली. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली शस्त्रे विक्रीसाठी ठेवल्याचे पाहून पोलिसही अवाक झाले.

रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 1 एयरगन, 10 तलवारी, 38 बटनचाकू, 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 25 चॉपर्स, 3 कुऱ्हाडी, 9 गुप्त्या, 1 कोयता, 5 सुरे, 9 कुकऱ्या, मोबाईल, काही रोख रक्कम असा एकूण 1 लाख 86 हजार 20 रूपये किंमतीच्या शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला. आरोपी धनंजय कुलकर्णी हा कर्जबाजारी झाला आहे. गेल्या 8-9 महिन्यांपासून सदर दुकानात शस्त्रास्त्रे विक्री करत आहे. ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, तसेच पंजाब, राजस्थान राज्यातून आणली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email