डोंबिवली ; नियमाचे उलंघ्घन करणाऱ्या रिक्षाचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्बात द्या

रिक्षा चालक-मालक संघटनेच्या मेळाव्यात आवाहन

डोंबिवली दि.२५ – शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अनेक रिक्षा चालक नियमांचे पालन करत असतो. मात्र काही बेशिस्त रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालक बदनाम होतात. म्हणून प्रमाणिक रिक्षाचालकांनी नियमाचे उलंघ्घन करणाऱ्या रिक्षाचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्बात द्या असे आवाहन रिक्षा चालक-मालक संघटनेच्या मेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अंभग यांनी डोंबिवलीत केले. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिक्षा टॅकसी चालक मालक संघटनेच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील विजय सोसायटी सभागृहात रिक्षा चालक- मालक भव्य मेळावा आयोजित केला होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दादाभाऊ अभंग यांनी उपस्थित रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले, रिक्षाचालक हे असंघटीत असतात. मध्यरात्रीही प्रवाशांना सुखरूपपणे त्यांना इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम रिक्षाचालक करत असतात.

हेही वाचा :- डोंबिवलीत ; सनकी डॉक्टर पतीचा बोगस सर्टिफिकेटच्या वादातून पत्नीवर चाकूने हल्ला

मात्र आज रिक्षाचालकांना त्यांच्यासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती नसते. म्हणून रिक्षाचालक अश्या योजनापासून वंचित राहतात. शहरात वाहतूक व्यवस्थे बिघडवीण्यास रिक्षाचालक जबाबदार असल्याचे बोलले जाते. मात्र वास्तविक काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे पालन करत नाही. म्हणून प्रामाणिक रिक्षाचालकांनी एकत्र येऊन अश्या रिक्षाचालकांना पोलिसांच्या ताब्यात द्या. पुढे स्वाभिमान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रिक्षा टॅकसी चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंभोरे म्हणाले, आज या मेळाव्यात जशी रिक्षाचालकांची उपस्थित दिसत आहे,त्याप्रमाणे रिक्षाचालकांनी एकजूट दाखवा. यावेळी पोलीस निरिक्षक सुरेश मल्लाव, पांडुरंग घाडगे, वैधनाथ केदार, डॉ.बाविस्कर, अनिल सरदार, बाळू रणशिंगे प्रकाश शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.

फेरीवाला हटविले मग फुठ्पाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना पालिका का अभय देतेय ?

स्टेशनबाहेरील १५० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसल्यास मनाई आहे. फुठ्पाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना पालिका का अभय देतेय ? अश्या दुकानदारांवर पालिका प्रशासन कारवाई करत नाही. पालिका प्रशासनाची अशी भूमिका विचार करायला लावणारी आहे असे मेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार दादाभाई अभंग यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email