डोंबिवली ; गॅस एजन्सीमध्येच घरगुती सिलेंडरमधून गॅसची चोरी
डोंबिवली दि.०३ – घरगुती सिलेंडरमधील गॅस चोरून तोव्यापारी दराने भरून त्याची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार कल्याण क्राईम ब्रँचने डोंबिवलीत उघडकीस आनला आहे. डोंबिवली पूर्वेतील पेंढारकर महाविद्यालयाच्या पाठीमागे हे गॅस गोडाऊन असून विशेष म्हणजे त्यामध्येच सर्रासपणे गॅस चोरी केली जात होती.या गेसची मालकी कॉग्रेसचे माजी आमदार असल्याचे समजते मात्र याला दुजोरा मिळत नाही डोंबिवलीत 3 गैस एजन्सी त्याच्या असल्याचे समजते. या गॅस गोडाऊनमध्ये गॅस चोरी करून त्या गॅसची बाजरात विक्री केली जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी याठिकाणी छापा टाकला असता हो चोरी सुरू असल्याचे दिसून आले.पहाटेच्या वेळेस अशी चोरी केली जात असल्याचे सांगितले जात आहे कारणं पहाटेच्या वेळेस इतर वायूचा पण वास पसरलेला असतो त्याचा फायदा घेऊन पहाटे ही चोरी होत होती गेले काही दिवस वोच ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :- डोंबिवलीत धावतात बेकायदा रिक्षा, ट्रफिक जामला ‘ब्रेक’ लावणार कोण ?
एका लोखंडाच्या नळीद्वारे घरगुती सिलेंडरमधून गॅस काढून तो कमर्शियल सिलेंडरमध्ये भरला जात होता. या नळीद्वारे अवघ्या 10 सेकंदात 2 किलो गॅस चोरी केला जायचा. चोरून काढलेला या कमर्शियल गॅसची बाजारात विक्री केली जात होती. कल्याण क्राईम ब्रँचने याप्रकरणी गॅस एजन्सीमधील 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये पोलिसांनी 240 सिलेंडर्स ताब्यात घेतले आहे. दरम्यान या छाप्यानंतर गॅस एजन्सीचा सुपरवायजर फरार झाला आहे. तर एजन्सी चालकाने मात्र याप्रकरणी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.