dombivli ; भूमिगत वीज वाहिन्या नसल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित

श्रीराम कांदु

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रातील औद्योगिक निवासी व ग्रमीण परिसरात वांरवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक तसेच उद्योजक त्रस्त आहेत. गेले काही दिवस वांरवार पडत असलेल्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यातच महावितरण कपंनी व महापालिका यांनी येाग्य प्रकारे झाडांच्या फांद्यांची छाटनी केली नाही यामुळेही वीज पुरवठा खंडित हेात आहे. वांरवार तक्रारी करुन नागरिक संतप्त झाले आहेत याचा स्फोट होण्याची भिती आहे. डोंबिवली ग्रमीण व औद्योगिक विभागात गेल्या एक वर्षापासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर इमारती व बंगले आहेत. महावितरणच्या सुमारे चाळीस हजार जोडण्या आहेत.

हा भाग कल्याण डोंबिवली महापालिकेत असूनही या भागाला डोंबिवली विभागातून वगळून कल्याण पूर्व मंडळात सामील केले आहे. डोंबिवलीत भूमिगत वीज वाहिन्या असून येथे वीज खंडित होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र औद्योगिक व निवासी भागात ओव्हरहेड वायर्स असल्याने विविध कारणामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील सर्व कंडक्टर्स जुने झाले असून ते बदलण्याची गरज आहे. शिवाय जमिनीखालून गेलेल्या विद्युत वाहिन्यांवर अनेक ठिकाणी डागडुजी केल्याने वीज पुरवठ्यात अडथळे येत आहेत. कल्याण ग्रमीण भागात सुारमे 2 लाख, 84 हजार वीज ग्रहक असून डोंबिवली विभागात 1 लाख 74 हजार ग्रहक आहेत, डोंबिवली लगत असलेल्या आजदे भाग औद्योगिक निवासी भाग येथील सुमारे 40 हजार वीज ग्रहक डोंबिवली विभागाला जोडण्यात यावेत म्हणजे कल्याण ग्रामीणचा ताण कमी होईल असे अधिकारी सांगत आहेत. यामुळे ग्रमीण भागावरील ताण कमी होईल असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.