डोंबिवली ; भूलथापा देत मोबाईल लंपास
डोंबिवली दि.२६ – डोंबिवली पश्चिमेकडील नेमाडी गल्ली रमण जोशी चाळीत राहणारे दीपक कनोजिया काल पावणे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील द्वारका हॉटेल नजीक उभा असताना एका अज्ञात इसम त्या ठिकाणी आला. तू मारामारी केली आहेस असे सांगत दीपकला बोलण्यात गुंतवून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी दीपक याने विष्णूनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: