Dombivli ; बापरे ! नळाच्या पाईपलाईनमध्ये मेलेली कोबंडी

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापलिका परिसरात आधीच पाणीटंचाई त्यातच गढूळ आणि दुर्गंधीयुक्त येणारे नळातून पाणी तर काही परिसरातील नळावाटे पाण्यात किडे इतपर्यत ठीक होते. आज मात्र कहरच झाला. चक्क नळाच्या पाईपलाईनमध्ये मेलेली कोबंडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या खळबळजनक घटनेमुळे नागरिकांच्या जीवाशी महापालिका खेळ करते कि काय ? असा सवाल करदाते नागरिकांकडून विचरला जात आहे. नळाच्या पाईपलाईनमध्ये मेलेली कोबंडी आढळून आल्याची घटना डोंबिवलीतील  सुर्यप्रकाशवाडी प्रगती कॉलेजच्या मागे असलेल्या पांडुरंग केणे चाळीत घडली आहे.

डोंबिवली पूर्वे परिसरात सुर्यप्रकाशवाडी येथील पांडुरंग केणे चाळीत समीर पाटील राहतात. गेल्या १० ते १५ दिवसापासून त्यांच्या नळाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत त्यांनी परिसरातही इतर नळधारकांना या बाबत विचारणा केली. मात्र पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे समीर पाटील यांनी त्यांच्या नळाच्या पाईपलाईनमध्ये काही तरी अडकल्याची भीती व्यक्त करत त्यांनी सकाळच्या सुमाराला प्लम्बरला बोलवून पाईपलाईन खोलून चेक केली. तर त्यांना धक्काच बसला. चक्क पाईपमध्ये त्यांना मेलेल्या कोंबडीसह कोंबडीची कातडी, हाडे, पिसे आदि कचरा आढळला. त्यांनी पाईपलाईनमधून आरोग्यास धोका असलेल्या मांसाहारची तुकडे काढून लाईन साप केली. नंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email