डोंबिवली ; बहिणीशी ओळख वाढवू नकोस सांगणाऱ्या भावाला बेदम मारहाण
डोंबिवली दि.२० – डोंबिवली पूर्वेकडील दत्त नगर संतोष भवन बिल्डींग मध्ये राहणारे सुनील कुसाळकर काल रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या परिसरात बसलेले असतांना त्या ठिकाणी विलास मोरे आला. विलास ला पाहताच सुनिल ने त्याला माझ्या बहिणीशी ओळख वाढवू नकोस असे सांगतिले.
हेही वाचा :- कल्याण ; खासगीकरणाविरुद्ध कडोंमपातील कर्मचारी कामगार सेना आक्रमक
त्यामुळे संतापलेल्या विलासने त्यांना स्टंपने मारहाण केली. या हल्ल्यात सुनील यांच्या डोक्याला व गालाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सुनील यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी विलास मोरे विरोधात गुन्हे दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: