डोंबिवली ; धूम स्टाईल लुटारूंचे थैमान
डोंबिवली दि.२७ – कल्याण डोंबिवली सह आसपासच्या ग्रामीण भागात धूम स्टाईल लुटेरानी एकच थैमान घातले असून पादचारी नागरिकांचा मोल्यवान ऐवज लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. दिवसभरात दोन घटनांची नोंद विविध पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; कारमधून पिस्तुल चोरली
कल्याण पश्चिम पारनाका येथे राहणारा तरुण शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास भालचंद्र कार्यालय येथील शु मॉल येथून पायी चालत जात असताना भरधाव वेगाने दुचाकी आली या दुचाकी वर तिघे जन होते त्यामध्ये मागे बसलेल्या इसमाचे या तरुणाच्या गळ्यातील चैन हिसकवून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी सायंकाळी बाजापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणायत आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- कल्याणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या
दुसरी घटना कल्याण स्टेशन परिसारत घडली. उल्हासनगर येथील आशेले गावात राहणारा गिरीश पै हा तरुण गेल्या सोमवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशन परीसारतील दिपक हॉटेल समोरून पायी चालत जात असताना दुचाकीवर भरधाव वेगाने आलेल्या एका तरुणाने पै याच्या हातातील मोबाईल हिसकवून क्षणार्धात धूम ठोकली. या प्रकरणी पै यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.