डोंबिवलीत गाडीचे पेपर्स विचारले म्हणून सहाय्यक फौजदाराला मारहाण

डोंबिवली दि.२८ – काल संध्याकाळी जैन मंदिर चार रस्ता भागात सहाय्यक फौजदार छगन धना धनगर (५७) यांनी एका कार चालकाला लायसनचे पेपर्स विचारले म्हणून कार चालकाने सहाय्यक फौजदार धनगर यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; भोपर गावात रोडरोमियोची दहशत भररस्त्यात तरुणीचा विनयभंग ….

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार रस्ता येथे त्या वाहन चालकाकडे लायसन पेपर्स मागितले म्हणून त्याला खाली उतरण्यास सांगितले त्याच्या कडे कागदपत्रे नसल्याने त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगून गाडीची चावी मागितली त्या चालकाने चावी देण्यास व पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला ,मी रवी पाटील यांचा माणूस आहे काय करतो ते बघतो असे म्हणून धनगर यांना धक्काबुक्की केली व छातीवर ठोसा मारल्याने ते खाली पडले. रस्त्यावरील नागरिकांनी आरडा ओरड करून त्या चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email