डोंबिवली – कंपनीत घरफोडी
डोंबिवली दि.२१ – मुलुंड येथे राहणारे सुहास कर्वे यांची डोंबिवली एम आय डी सी परिसरात स्वार इंजिनियरिंग वर्क नावाने कंपनी आहे. मंगळवारी रात्री कंपनी बंद करून सगळे घरी निघून गेले. अज्ञात चोरट्याने कंपनीच्या शटर गाईड पट्टी वाकवून शटर उचलून कंपनीत प्रवेश करत कंपनी मधील ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. काल सकाळी कंपनी उघडण्यास गेले असता कर्वे यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- कल्याण ; महापालिका सफाई कामगारांना शिवीगाळ
Please follow and like us: