डोंबिवली संक्षिप्त वृत्त

ब्राह्मण महासंघातर्फे ‘स्वरपंचमी’

डोंबिवली दि.१८ :- ब्राह्मण महासंघातर्फे येत्या २ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सावित्रीबाई फुले नाटय़गृहात ‘स्वरपंचमी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सशुल्क आहे.‌ कार्यक्रमात स्वरा जोशी, गौरी गोसावी, श्रद्धा वैद्य, ओंकार कानिटकर, धीरज शेगर हे बालगायक सहभागी होणार असून  कार्यक्रमाचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. सागर साठे (कीबोर्ड) , विजू तांबे (बासरी) , सिद्धार्थ कदम ( तालवाद्य ) , हनुमंत रावडे ( ढोलक ढोलकी पखवाज ) , अर्चिस लेले ( तबला) हे संगीतसाथ करणार असून निवेदन अनघा मोडक यांचे आहे.

 

प्राची गडकरी यांचे व्याख्यान- देवाचिये द्वारी

डोंबिवली – विश्वम आर्ट क्रिएशन्सतर्फे येत्या २० नोव्हेंबर रोजी
संध्याकाळी पाच वाजता ‘देवाचिये द्वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्व टिळकनगर येथील क-हाडे ब्राह्मण सेवा मंडळाच्या समाज मंदिर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात प्राची गडकरी यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.

 

स्नेह मेळावा नियोजनासाठी माजी विद्यार्थ्यांची बैठक

डोंबिवली – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (राणाप्रताप) विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित् पुढील महिन्यात माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मेळाव्याची तयारी आणि नियोजनासाठी १९ नोव्हेंबर २०२२ रोजी राणाप्रताप शाळेच्या हेडगेवार सभागृहात दुपारी चार वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.