डोंबिवली ; दुचाकी चोरट्याचे थैमान
डोंबिवली दि.२८ – कल्याण – डोंबिवली मध्ये दुचाकी चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत असून त्यामुळे वाहनचालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस स्थानकात काल दिवसभरात दोन दुचाकी चोरीची घटनांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण पूर्व काटेमानवली साई बाबा नगर येथे राहणारे नितीन साखरे यांनी आपली दुचाकी सोमवारी सकाळी कामावर जाताना विठ्ठलवाडी स्थानका लागत पार्क केली सायंकाळी पुन्हा परतले असतना त्यांना दुचाकी आढळली नाही.
हेहि वाचा :- कल्याण डोंबिवलीत घरफोड्या
शोध घेऊन दुचाकी न सापडल्याने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी कोल्शेवादी पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील भोईरवाडी खंबाळपाडा येथे शंकेश्वर सोसायटी मध्ये राहणारे श्रीभूष्ण तिवारी यांनी आपली दुचाकी खंबाळपाडा येथील एका लादी कंपनी समोर उभी करून ठेवली होती अज्ञात चोरट्याने हि दुचाकी चोरून नेली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.