Dombivali ; क्रेडिटकार्डद्वारे बँकेची केली लाखोंची फसवणूक

डोंबिवली दि.१० :- एका बँकेकडून देण्यात आलेले के्रडिटकार्ड स्वत:चे नसल्याचे माहीत असूनदेखील त्याद्वारे सुमारे चार लाख ९१ हजार रुपयांची खरेदी करून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह अन्य एकाविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्वेत राहण-या एका ५४ वर्षीय महिलेने के्रडिटकार्ड मिळविण्यासाठी जुलै महिन्यात बँकेत अर्ज केला होता. या महिलेच्या सर्व प्रकारच्या कागदांची पडताळणी करून संबंधित बँकेने अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे के्रडिटकार्ड कुरिअरच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात तिच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर, केवळ १५ दिवसांत के्रडिटकार्र्डच्या माध्यमातून सोने, सामान तसेच रोख रुपये असे सुमारे चार लाख ९१ हजार रुपये काढण्यात आल्याचे बँकेच्या निदर्शनास आले.

हेही वाचा :- डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट

त्यामुळे, संबंधित बँकेतील फ्रॉड अ‍ॅण्ड रिस्क मॅनेजमेंट आॅफिसर यांनी त्या महिलेशी संपर्क साधला. तेव्हा, सचिन नावाची व्यक्ती बँक कर्मचारी असल्याचे सांगत मला भेटण्यासाठी आल्याचे संबंधित महिलेने सांगितले. त्याने बँकेचे के्रडिटकार्ड काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि अर्ज घेऊन गेला. मात्र, अद्याप आपल्याला के्रडिटकार्ड प्राप्त झाले नसल्याचे महिलेने बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश च्याप्रकरणी आणखी चौकशी केली असता, तक्रारदार महिलेच्या नावाने दुसरीच महिला के्रडिटकार्ड वापरत असून तिनेच के्रडिटकार्र्डद्वारे लाखोंची खरेदी केल्याचे उघडकीस आले. बँकेची लाखोंची फसवणूक करणा-या या दोघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे

हिन्दुस्तान विश्व शक्ति की और, एकबार फिर साबित हुआ, modi है तो मुमकिन है 

https://youtu.be/ty0PBAyxyzg

 

Leave a Reply

Your email address will not be published.