डोंबिवली ; खंडणीखोर भावडांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
डोंबिवली दि.३० – अनधिकृत बांधकामावर केडीएमसीमार्फत कारवाई करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या डोंबिवलीतील कल्पेश जोशी, विनोद जोशी आणि कुंदन जोशी या खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपी विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्पेश जोशी,विनोद जोशी आणि वसंत जोशी या तिघांनी डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे हेरून या बांधकाम करणाऱ्या बिल्डरना महापालिकेकडे या बांधकामाची तक्रार करत कारवाई करण्याची धमकी देत त्यांच्याकडून लाखो रुपयाची खंडणी उकलली.
हेही वाचा :- डोंबिवली ; जमिनीच्या सर्वेस विरोध करत सर्वेयर सह महिला कर्मचा-याला बेदम मारहाण
काही दिवसापूर्वी एका बिल्डर कडून अशा प्रकारे खंडणी उकळताना खंडणी विरोधी पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे. यानंतर काही दिवसात एका बिल्डरने या त्रिकुटाने आपल्याला देखील माहिती अधिकाराच्या नावाखाली धमकावत पैसे उकलल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. त्या पाठोपाठ विनोद जोशी ,कल्पेश जोशी ,कुद्न जोशी या त्रिकुटाने तुमच्या इमारतीचे काम अनधिकृत असल्याची वेळोवेळी धमकी देत तक्रार करू अन्यथा ५ लाख रुपयांची मागणी केली अशी मनोज पाटील या बिल्डरने तक्रार विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.