Dombivli ; पिण्याच्या पाण्यात कचरा

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील ब्राह्मण सभेजवळील कृष्णराधा सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून सध्या पाण्याच्या वाहिनीत झाडाच्या काड्या, कचरा, पाने, चिखल यांसारखा कचरा वाहून येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यांनी बुधवारी पालिका अधिकाऱ्याकडे धाव घेत याबाबत जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांनी पाइपलाइनमधून कचरा येत असेल तर वाहिनी बदलून दिली जाईल, असे उत्तर देत त्यांना परत पाठवले.

हेही वाचा :- kalyan ; कांबा परिसरात आढळला मृतदेह

या संदर्भात महापालिका पाणीपुरवठा विभागात चौकशी केली असता कमी दाबाने गढूळ पाणी येत असल्याची तक्रार आल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. ही इमारत रस्त्याच्या टोकाला असल्याने येथील जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी येत असून या जलवाहिनीत कचरा अडकून राहतो. हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले. पाण्याच्या पाइपलाइनमधून कचरा आल्याने त्रस्त नागरिकांनी बुधवारी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात पाणीपुरवठा विभागाला जाब विचारला. मात्र पाणीपुरवठा विभागाने ही गंभीर बाब नसून आवश्यक वाटल्यास पाण्याची वाहिनी बदलून देऊ, असे सांगत नागरिकांची बोळवण केली.

Badlapur, और बांगनी स्टेशन के बिच फसी महालक्ष्मी एक्सप्रेस, ७०० यात्री फसे, NDRF की टीम सक्रीय
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email