डोंबिवली – मंदिरातून चांदीचा मुकुट चोरणारा गजाआड

डोंबिवली दि.२१ – पहाटेच्या सुमारास मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट चोरून नेणारा चोरटा पोलिसाच्या सतर्कतेमुळे गजाआड झाला आहे. सदर घटना डोंबिवली पूर्वेकडील संदप रोड परिसरात घडली असून या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात आनंद सोनावले या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व संदप रोड परिसरात वेताळेश्वर मंदिर आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतील बांधकाम व्यवसायिकाला खंडणीची आणि जीवे ठार मारण्याची धमकी..

काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आनंद सोनावले या चोरटा मंदिररात घुसला. त्याने मंदिराच्या मूर्तीच्या डोक्यावर असलेला चांदीचा मुकुट चोरला व पळून जाण्याच्या बेतात असताना गस्ती वर असणा-या मानपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई संतोष वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी या चोरट्यालापकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी आनंद सोनावले या चोरट्या विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email