डोंबिवली ; कर्जाला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या
डोंबिवली दि.१२ – डोंबिवली पूर्व शेलार चौक इंदिरा गांधी नागर येथे राहणारे महेद्र ठोके याने त्याचा मित्र शफिक शेख या दोघांनी प्रकाश अन्ना नावाच्या इसमाकडून कर्ज घेतले होते. मात्र शफिक काही दिवसापुर्वी अचानक पळून गेल्याने प्रकाश अन्ना याच्याकडून घेतलेले सर्व कर्ज ठोके याच्या अंगावर पडले होते.
हेही वाचा :- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचे उद्घाटन
या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने ठोके याची मानसिक स्थिती खालावली होती. याच नैराश्येतून महेंद्र ठोके याने आत्महत्या केली. या प्रकरणी महेंद्र ठोके याचा भाऊ सुरेंद्र ठोके यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: