डोंबिवली ; ठाणे जिल्हा ड्रग्समुक्त करण्यासाठी ईगल ब्रिगेडचा पथनाट्यातून जनजागृतीचा संदेश

डोंबिवली दि.२६ – ठाणे जिल्हा ड्रग्समुक्त करण्यासाठी व सायबर क्राईम मुक्त करण्यासाठी ईगल ब्रिगेड आणि डोंबिवली पोलिस विभाग पथनाट्यामार्फत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉ.संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत, पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह पवार, एस.बी.सावंत, गजानन काब्दुले यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ईगल ब्रिगेड फाउंडेशनच्या दरवर्षी असा उपक्रम राबविला जातो. सायबर क्राईम व अँटी ड्रग्स कॅम्पेन या विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून बाळगण्यात येणारी सावधानता याबाबतची माहिती यावेळी देण्यात आल्याचे फाउंडेशन संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.

हेही वाचा :- अजित पवार गुरुवारी डोंबिवलीत

ईगल ब्रिगेड फाउंडेशन व डोंबिवली पोलिस विभाग यांच्यामार्फत केलेल्या पथनाट्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे १५००-२००० नागरिकांपर्यंत पथनाट्यामार्फत जनजागृतीचा संदेश पोचवण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. उपस्थित तरुणांनी व नागरिकांनी ठाणे जिल्हा ड्रग्समुक्त करण्यासाठी व सायबर क्राईम मुक्त करण्याची शपथ घेण्यात आली. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. उत्सवामध्ये संजय गायकवाड, मंदार लेले, अनुप इनामदार, ओजस ठोंबरे, स्वप्नील महाजन, योगेश साबळे, प्रशांत बापट, चिराग ठक्कर व इतर सदस्यांचा समावेश होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email