डोंबिवली ; दोन महिन्यात २५० वाहनचालकाचे परवाने रद्द…
डोंबिवली दि.११ – वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस आणि आरटीओने वाहतूक नियमांचे उल्लंघना करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यास सुरु केली. गेल्या दोन महिन्यात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २५० वाहन चालकांचे परवाने आरटीओने रद्द केल्याची माहिती कल्याण आरटीओ संजय ससाणे यांनी दिली. दरम्यान मोबाइलवर बोलणे, मद्यपान करुन वाहन चालविण्यासह क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक आदी प्रकरणीहि कारवाई करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली शहरात अपघातांचे प्रमाण वाढत असून निष्पाप नागरिकांना या अपघात जीव गमवावा लागत आहेत. वाहन चालकांकडून होणाऱ्या चुका तसेच धोकादायक ठिकाणांवर बेशिस्तपणे वाहन चालविण्यामुळे अनेकदा घडणाऱ्या अपघतात अनेक नागरिकांना अपंगत्व आले.
हेही वाचा :- डोंबिवली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने `चलो पंचायत अभियान`
तर काहीना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक (ओव्हरलोड) आणि मद्यपान करुन वाहन चालवने आदी कारणाने अपघाताचे प्रमाण वाढत होते त्यामुले शहर वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे शहरात कारवाई सुरु केली. रॅश आणि फास्ट ड्रायव्हिंग, , हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे , मोबाइलवर बोलणे,क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक (ओव्हरलोड) आणि मद्यपान करुन वाहन चालवने आदी मध्ये गेल्या दोन महिन्यात हजारांहून अधिक वाहनांची तपासणी केली. त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविले, त्यानुसार कल्याण आरटीओने सुमारे २५० परवाने निलंबित केल्याची माहिती कल्याण आरटीओचे अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.