डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.२१ – डोंबिवली पूर्वेकडील सागाव रवी किरण सोसायटी श्री बिल्डींग मध्ये राहणारे सोनाजी शेजूळ दुपारी राहत्या घराला कुलूप लावून कामांनिमित्त बाहेर गेल होते. हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घराचे दागिने रोकड असा मिळून एकूण ७३ हजारांचे मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत प्रदुषण मंडळ कार्यालय हवे…
Please follow and like us: