डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.२३ – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातल्याने बंद घरे हेरून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. या वाढत्या कारवायामुले पोलीस यंत्रणा चक्रावली आहे. डोंबिवली पूर्व टावरे पाडा आयरे गाव येथे साईराज चाळ येथे महेंद्रसिंग परमार सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून १ लाख ३८ हजाराचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.