Dombivali ; पूर्ववैमनस्यातून बहीण-भावावर हल्ला
डोंबिवली दि.१९ :- डोंबिवली पश्चिमेकडे गरीबाचा वाडा परिसरातील सह्याद्री नगरमधल्या साईश्रद्धा चाळीत राहणाऱ्या सुजल पवार व त्यांचा भाऊ कल्पेश साळवे यांचे महेंद्र कनोजिया, रोहन फोनके, करण कनोजिया, कृष्णा खोचरे यांच्याशी काही दिवसांपूर्वी वाद झाले हो
याच वादाचा राग मनात धरून १४ जानेवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कल्पेश घरी आला असता महेंद्र कनोजिया, रोहन फोनके, करण कनोजिया, कृष्णा खोचरे या चौघांनी त्याला गाठले. शिवीगाळ करत स्टीलच्या पाईपने हल्ला चढवला.
हेही वाचा :- मुद्रा लोणच्या माध्यमातून लाखोंचा चूना दुकलीचा शोध सुरू
हे पाहून सुजल ही भावाला सोडवण्यास मध्ये पडली असता तिला देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी महेंद्र कनोजिया, रोहन फोनके, करण कनोजिया आणि कृष्णा खोचरे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे.