डोंबिवलीच्या पॉजकरांनी उल्हासनगरातील कुत्र्यांना केले रेबिजमुक्त

डोंबिवली दि.१५ :- फेब्रुवारी २०१९ मध्ये एका कुत्र्याने १६ जणांचा चावा घेतल्यानंतरही उल्हासनगर महानगरपालिकेला जाग आलेली नाही. अनियोजित रस्ते, कचरा निर्मूलन आणि उघड्या कचरापेट्या ह्या सर्वत्र दिसतात. त्यात महापालिकाकडे श्वान नसबंदीसाठी कोणतीही उपाय योजना नाही. जागतिक आरोग्य संघटेनेने सांगितल्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आवश्यक आहे आणि त्याना रेबीज प्रतिबंधक लस दरवर्षी देणे जरुरी आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या पॉजकरांनी उल्हासनगरातील भटक्या कुत्र्यांसह मांजरांना रेबिजमुक्त केले.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

 पॉज संस्थेने पुढाकार घेतला आणि रविवारी संस्थेच्या प्रशिक्षित कार्यकर्ते आणि पशु वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उल्हासनगर पश्चिमेकडे जवळपास २०० च्यावर भटक्या कुत्र्यांसह मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस टोचली. यासाठी १६ जणांच्या टीमने भाग घेऊन गोल मैदान, शांतीनगर भागात फिरून लसीकरण केले. यावेळी पॉज संस्थेचे निलेश भणगे यांनी नागरिकांना नसबंदी, रेबीज संदर्भात उपयुक्त माहिती दिली.

ते म्हणाले, रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी विशेषतः कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होणारा रोग आहे. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसांत दिसू लागतात.

हेही वाचा :- Kalyan ; देवगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दोन्ही पुष्पातील अदाकारीने संगीतप्रेमी तृप्त

जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात, त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात, त्यामुळे त्यांना हा रोग होतो. अशी रेबीज झालेली कुत्री माणसाला चावल्यास माणसांना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो. रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो. आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो. तो तहान-भूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधीकधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात. प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो. रेबीज हा रोग कोणत्याही उष्ण रक्ताच्या प्राण्याला होऊ शकतो.

हेही वाचा :- सोमवारी २७ गावांचा केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा

उदाहरण द्यायचे झाल्यास माणूस या रोगाचे लक्ष होऊ शकतो. विशेष म्हणजे हा रोग पक्ष्यांमध्येसुद्धा आढळून आला आहे. वटवाघळे, माकडे, कोल्हे, गाई-गुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो. खारी, hamsters, guinea pigs, उंदीर या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो. रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो. माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो, असेही भणगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.