Dombivali ; बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जावर मोबाईल घेणारा भामटा बेपत्ता

Hits: 0

डोंबिवली दि.०५ :- बनावट कागदपत्रांच्या आधारे महागडे मोबाईल खरेदी करण्यासाठी कर्ज काढून फायनान्स कंपन्यांना गंडा घालणाऱ्या भामट्या विरोधात डोंबिवली पोलिसांच्या ठेसनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील एका दुकानात मुकेश प्रजापती नावाच्या एका इसमाने महागडा मोबाईल विकत घेतला. त्यासाठी त्याने एका फायनान्स कंपनीकडून १९ हजार ६४२ रुपयांचे कर्ज घेतले.

हेही वाचा :- कल्याणात भरदिवसा घरफोडी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी घरात ठेवलेले पैसे चोरले

सदर सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याचे संबंधित कंपनीच्या लक्षात आले. तसेच या आधी देखील याच इसमाने शासन हसमुख गाला नावाने खोटे व बनावट कागदपत्रे सादर करत कर्ज घेत २१ हजारांचा मोबाईल खरेदी करत कंपनीची फसवणूक केल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी मुकेश प्रजापती नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.