Dombivali ; आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटरतर्फे विनामूल्य नाडीपरीक्षण शिबीर
{श्रीराम कांदु}
डोंबिवली दि.०१ :- आयुर्वेदिक आरोग्य निगा क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेली आघाडीची संस्था आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटरतर्फे विनामूल्य नाडीपरीक्षण शिबिराचे आणि मोफत आरोग्य सल्लाचे आयोजन डोंबिवली (पूर्व) येथे शनिवार ५ ऑक्टोबर आणि रविवार ६ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आले आहे. आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर, शॉप नं. ५, पहिला मजला, हरे गोविंद सोसायटी, सुभाष डेअरी समोर, केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व)- ४२१२०१ येथे सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे नाडीपरीक्षण शिबीर चालणार असून विविध आजारांनी पछाडलेले रुग्ण या संधीचा फायदा घेऊ शकतात. तसेच रुग्णांना आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्यांना यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला देण्यात येईल. अधिक माहितीसाठी आणि तुमचे नाव नोंदविण्यासाठी कृपया ०२५१-२४५०६६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा १८००२६६३००१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा :- कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेत बंडखोरी
आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटरच्या संस्थापिका डॉ. स्मिता नरम म्हणाल्या की, ‘अस्थमा, सांधेदुखी, मधुमेह, सोरायसीस, पाठीचे दुखणे, लठ्ठपणा, दीर्घकालीन थकवा, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, एपिलेप्सी, दमा, मुलांना होणारी अॅलर्जी, पित्तांचे आजार, जठारांचे आजार आणि इतरही कित्येक दुधर्र आजार असलेल्या तब्ब्ल ५ लाखांहुनही अधिक रुग्णांना आमच्या केंद्रांनी मदत केली आहे. जागतिक स्तरावर कित्येक क्लिनिकमध्ये व्याख्याने आणि सल्ला शिबिरे आयोजित केली जातात. आम्ही ३०० वैद्यकीय उत्पादनांचे भांडार तयार केले आहे. त्यात हर्बल फूड सप्लीमेंट आणि सौंदर्य निगा उत्पादनांचा समावेश आहे. त्यासाठी दोन हजार वर्षे आणि निरंतर ग्रंथाचा अभ्यास केला गेला आहे.’
हेही वाचा :-जिल्ह्यात आज एक उमेदवारी अर्ज दाखल
पत्ता- आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर, शॉप नं. ५, पहिला मजला, हरे गोविंद सोसायटी, सुभाष डेअरी समोर, केळकर रोड, रामनगर, डोंबिवली (पूर्व)- ४२१२०१ येथे शनिवार ५ आणि रविवार ६ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे नाडीपरीक्षण शिबीर चालणार आहे. अधिक माहितीसाठी आणि तुमचे नाव नोंदविण्यासाठी कृपया ८६५५११६४५० / ९७७३३४२१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.