Dombivali ; क्षुल्लक वादातून तरुणासह कुटुंबाला मारहाण
डोंबिवली दि.१६ :- विक्रांत बेंद्रे हा तरुण रविवारी रात्री सोसायटीसमोरील रस्त्यावरून जात असताना त्याला नीलेश मुकादम हा तरुण एका मुलीस मारत असल्याचे दिसले. बेंद्रे याने नीलेशला हटकले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला.
हेही वाचा :- वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची १०० रुपयांच्या व्यवहारामुळे हत्या
डोंबिवली पूर्वेकडील निवासी विभाग पोलिस कर्मचारी वसाहतीमध्ये राहणारा विक्रांत बेंद्रे हा तरुण रविवारी रात्री सोसायटीसमोरील रस्त्यावरून जात असताना त्याला नीलेश मुकादम हा तरुण एका मुलीस मारत असल्याचे दिसले. बेंद्रे याने नीलेशला हटकले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाला.
हेही वाचा :- बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार नसती – राज ठाकरे
संतापलेल्या नीलेशने तेथून काढून पाय घेतला. काही वेळाने त्याने आपला साथीदार महेंद्र व इतर दोघांसह बेंद्रे यांचे घर गाठत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने त्यांच्यासह आई व वडिलांनादेखील मारहाण केली. सामानाची नासधूस केली.