Dombivali ; पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल

डोंबिवली दि.१७ :- राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात आराखडा मंजुरीसाठीचे नियोजन रेल्वेला २१ जुलैला दिले आहे. मात्र, रेल्वेकडून त्यास अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रीपुलाशेजारीच केडीएमसीने बांधलेला दुपदरी उड्डाणपूल सध्या वापरला जात आहे. मात्र, तो अपुरा पडत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तर, जुन्या पत्रीपुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे प्राथमिक काम सुरू आहे.

हेही वाचा :- ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. आरवमुदन यांनी लिहिलेल्या, ‘इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे!’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित

त्यामुळे हा पूल झाल्यानंतर एकूण चारपदरी रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. राज्य रस्ते महामंडळाचा आणखी एक १११ मीटर लांब आणि ११ मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या पुलासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे, असेही महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले. जुना पत्रीपूल जेथे पाडला, त्या जागी प्रस्तावित नवा पूल बांधण्याचा अधिकाºयांचा मानस आहे. तर, महापालिकेच्या सध्याच्या पुलाला लागून असलेल्या मोकळ्या नवीन पुलासाठी खोदकाम सुरू आहे, असे सांगण्यात आले. जर नवा पूलही झाला, तर एकूण सहापदरी पूल होतील आणि त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.