Dombivali ; टिकटॉक च्या नादात १४ वर्षीय मुलाने सोडले घर
डोंबिवली दि.०६ :- पूर्वेत रहणा-या एका मुलाला टिकटॉक बनविण्याची एवढी आवड होती कि त्यांने घरातून कपडे आणि २० हाजारांची रक्कम घेऊन घरातून निघून गेला. या मुलाचे शिक्षण आठवी पर्यंत झाले आहे. त्याला टिकटॉक वर व्हिडिओ बनविण्याची आवड आहे. त्यातून तो नेहमी सेलिब्रिटी व् मॉडेल यांचे फोटो नेटवर शोधत असतो.
हेही वाचा :- आरेमध्ये भररात्री वृक्षतोडीस सुरुवात, झाडे कापल्याचे पाहून पर्यावरणप्रेमींचे अश्रू अनावर
शुक्रवारी दुपारी त्याचे वडील कामावर, व बहिन महाविधालयत गेली होती. हीच संधी साधत त्याने आपल्या आईला शेजारी राहणा-या काकूने बोलावल्याची बतावनी केली. त्यानंतर तो घरातून निघून गेला. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.