हलाल’ चा शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नका

अभिनेते शरद पोंक्षे यांचे आवाहन

नवी मुंबई- राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे असाल तर ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नका, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर ते बोलत होते.

५६ मुस्लिम राष्ट्रांमध्ये हलाल शिक्का असलेल्याच वस्तू विकण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे, त्यांच्या देशात एखादे उत्पादन विकायचे असल्यास त्याला हलाल प्रमाणित करून त्याच्यावर हलालचा शिक्का मारल्यानंतर ते अधिकृत ठरवले जाईल असे सुरू करण्यात आले आहे, हळूहळू याचे लोण जगभर पसरायला लागले असल्याचे सांगून पोंक्षे म्हणाले, भारतात काही दुकानांमधील वस्तूवर हलालचा शिक्का दिसू लागला आहे.

भारतात त्यांनी हॉटेलही हलाल प्रमाणित करून घेतली आहेत. हलाल प्रमाणित उत्पादने विकून येणारा पैसा इस्लामिक दहशतवादाची ताकद वाढविण्यासाठी वापरला जात आहे.

कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, ‘सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष संतोष कानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्यवाह उत्तम पवार आदी उपस्थित होते.
————

Leave a Reply

Your email address will not be published.