डोंबिवलीतील नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या घरातील दिवेबंद आणि घंटानाद आंदोलन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.१९ :- डोंबिवलीतील नागरी सोयी- सुविधांचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. याचा निषेध आणि ढिम्म महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी उद्या गुरुवारी (२० ऑक्टोबर) डोंबिवली बिगर राजकीय जन आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून घरातील दिवेबंद आणि घंटानाद/थाळीनाद आंदोलन केले जाणार आहे.‌

हेही वाचा :- डोंबिवलीतील नागरी समस्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतून याबाबत माहिती दिली जात आहे.‌ हे जन आंदोलन राजकारण विरहित असून ते ‘आमचे तुमचे सर्वांचे, लोकांनी लोकांसाठी केलेले लोकांचेच आंदोलन आहे, ‘ चला, सुरूवात तर करूया’ असे आंदोलनविषयी म्हटले आहे.‌

हेही वाचा :- जय जय महाराष्ट्र माझा’ला आता राज्य गीताचा दर्जा

२० ऑक्टोबर रोजी सर्व नागरिकांनी रात्री ८ ते ८.०५ या वेळेत घरातले दिवे बंद करावेत आणि थाळीनाद/ शंखनाद/ घंटानाद करून परिसर दणाणून सोडावा. आपापल्या परिसरात गटागटाने हे जागरण अभियान केले जावे. आपला असंतोष योग्य आणि अहिंसक पद्धतीने आणि शक्यतो एकत्रितपणे व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

हेही वाचा :- टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाचे उद्या उदघाटन

Leave a Reply

Your email address will not be published.