जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांची पत्रकारपरिषद

ठाणे दि.११ – लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल एप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देखील याबाबतीत अवगत करण्यात आले आहे असे सांगून त्यांनी पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय असून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात २३-भिवंडी, २४-कल्याण आणि २५-ठाणे असे ३ लोकसभा मतदारसंघ आहेत. आणि याठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या पत्रकार परिषदेस ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने , उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर उपस्थित होत्या.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील . पेड न्यूज संदर्भातही समिती कार्यवाही करेल.

भरारी पथके

जिल्ह्यात ७२ भरारी पथके नेमली असून २१ व्हिडिओ देखरेख पथके, तसेच ७२ स्थिर देखरेख पथके असणार आहेत. एकूण ६२ हजार कर्मचारी ही निवडणूक पार पाडणार असून निवडणूक कामांत हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही राजेश नार्वेकर म्हणाले. सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळhttps://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

मतदारांची संख्या वाढली

सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.31 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email