दोन दिवसीय मोफत शासकीय दाखले शिबिरात ७५३ दाखल्यांचे वाटप

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / शिवसेना संलग्न युवा सेना व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशा साठी लागणारे व जेष्ठ नागरिकांचे साठी वयाचा दाखला याचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात ७५३ दाखल्याची वाटप करण्यात आले.या दाखला वाटप शिबिराचा लाभ विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांनी घेतला. रेतीबंदर रोड येथील गावदेवी मंदिर हॉल(तन्वी प्लाझा)या वाताणकुलीत हॉल मध्ये हे मोफत दाखले वाटप शिबीर घेण्यात आले.

शालान्त परीक्षेचा निकाल लागल्यावर कॉलेज प्रवेशा साठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते.या साठी डोमासिल,उत्पनाचा दाखल आवश्यक असतो. विद्यार्थ्यांना यासाठी तहसीलदार कार्यालयात धावपळ करावी लागते. पण एक फॉर्म जमा करने व दुसऱ्या दिवशी दाखले या मोफत दाखले वाटप शिबिरात मोफत मिळत असल्याने या साठी विद्यार्थी व त्यांचा पालकांची झुंबड उडाली होती.

युवा सेना तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व नगरसेवक जयेश म्हात्रे तसेच त्यांचे सहकारी व यांनी या दोन दिवस दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते.कोणतीही गडबड न होता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या दाखले वाटप शिबीरा बाबत विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त करीत दिपेश म्हात्रे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.