पेढ्यात गुंगीचे औषध देवून रोकड लंपास
डोंबिवली दि.१७ – डोंबिवली पूर्वेकडील घरीवली प्रीमियर कॉलनी येथे राहणारे भास्कर पाटील हे रिक्षा चालक असून काल सकाळच्या सुमारास ते डोंबिवली स्टेशन ते कल्याण बिर्ला मंदिर येथे जात असताना एका अज्ञात इसमाने त्याना पेढा दिला पेढा खाल्यानंतर काही वेळात भास्कर बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्याचे संधी साधत अज्ञात इसमाने त्याच्या गळ्यातील चैन व रोकड असा एकूण ३१ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल काढून अज्ञात इसम पसार झाला. या प्रकरणी भास्कर यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: