महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला केली तस्करी केलेल्या विदेशी पक्षांची सुटका

नवी दिल्ली, दि.३० – भारत-बांगलादेश सरहद्दीवर नॉर्थ 24 परगाणा येथे बांगलादेशातून काही विदेशी पक्षांची तस्करी एका वाहनातून केली जात असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली. चकदाहा/कल्याणी महामार्गावरुन हे वाहन कोलकात्याच्या दिशेने जात होते. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुरागाचा इथे या वाहनाच्या चालकासह तिघांना ताब्यात घेतले. गाडीत आणि डिकीमध्ये 21 पक्षी प्लॅस्टिकच्या बॅग्समधून कोंबलेले आढळले. त्यांची सुटका करुन ते कोलकाता प्राणी संग्रहालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email