प्रत्यक्ष कर संकलनात 16.7 टक्के वाढ

नवी दिल्ली, दि.०४ – वित्त वर्ष 2018-19 मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत एकूण प्रत्यक्ष कर संकलन 5.47 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ते 16.7 टक्क्यांनी अधिक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वित्त वर्ष 2017-18 मध्ये याच कालावधीतल्या संकलनात प्राप्तिकर घोषणा योजना 2016 अंतर्गतच्या 10,254 कोटी रुपयांचा समावेश होता. चालू वित्त वर्षाच्या संकलनात अशा प्रकारच्या रकमेचा समावेश नाही.

एप्रिल ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 1.03 लक्ष कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला असून तो मागील समकालावधीच्या तुलनेत 30.4 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2018 या कालावधीत निव्वळ संकलनात 14 टक्क्यांनी वाढ झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email