क्षयरोग चाचणीचे सीबीनॅट अत्याधुनिक मशीन कार्यान्वित दोन तासात होणार क्षयरोगाचे निदान

{म.विजय}

ठाणे दि.०६ :- क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाकरिता त्याचे अचूक व त्वरित निदान होण्यासाठी ठाणे महानगरपालिका व इंडियन ऑईल यांच्या सहकार्याने सी.आर.वाडिया हॉस्पिटल येथे बसविण्यात आलेले अत्याधुनिक सीबीनॅट मशीन मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यान्वित करण्यात आले. यावेळी क्षयरोगावर मात करत शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध माळगांवकर, उप वैद्यकीय अधिकारी डॉ.वैजयंती देवगेकर, क्षयरोग अधिकारी खुशबू टावरी, इंडियन ऑईलचे महाप्रबंधक(सीएसआर) सुबीर श्रीवास्तव, वरिष्ठ प्रबंधक सौम्या आनंद बाबू, वाडिया हॉस्पिटलचे डॉ. कृष्णमूर्ती, डॉ. श्रीमती सोनावणे, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ.ज्योती साळवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :- देवेंद्र फडणवीस ‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

सीबीनॅट मशीनमुळे क्षयरोगाचे निदान अवघ्या दोन तासात होणार आहे. खाजगी हॉस्पिटल मध्ये २५००० ते ३०००० रुपये इतका खर्च असणारी ही चाचणी वाडिया हॉस्पॉटलामध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर ठाण्यातच ही मशीन कार्यान्वित करण्यात आली असून या मशीनवर एकावेळी ८ रुग्णांच्या क्षयरोगाची चाचणी करता येऊ शकते. तसेच खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णांची चाचणी देखील येथे मोफत करण्यात येणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.

हेही वाचा :- शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी बंजारा समाजातर्फे भोगभंडारा

क्षयरोगाचे निदान करण्यासाठी वेगवान चाचणी करण्याकरिता सीबीनॅट मशीन उपयुक्त ठरणार आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे व पूर्ण कालावधीसाठी (६ महिने किंवा अधिक) उपचार घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्वरित उपचार चालू केल्यास रुग्णाला चांगला फायद्याचे असून त्याच्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यताही कमी होईल. ठाणे महापालिका परिसरातील क्षयरोगाची लागण होऊन देखील इयत्ता १० वी १२ वी शालांत परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गंभीर आजारावर मात करत वेळेवर औषध उपचार घेऊन हे यश संपादन केले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे महापालिकेच्यावतीने विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email