मराठा क्रांती मोर्चातर्फे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन
मुंबई दि.०९ :- ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण, खोपर्डी घटनेतील आरोपींच्या शिक्षेची अंमलबजावणी आदी विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आज आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते चेंबूरमधील पांजरापोळ सर्कल येथे उपस्थित झाल्याने शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
टिळकनगर बाल मंदिराच्या ‘अमृतपुत्र’ गौरव समारंभात ४३ विद्यार्थ्यांचा गौरव
खोपर्डी घटनेतील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करा, ओबीसी जातीतील प्रवर्गातील जातीचे फेरसर्वेक्षण, गायकवाड आयोगाच्या शिफारीनुसार मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आदी विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.