विकास कामांचे उदघाटन राजकारण्यांच्या हस्ते नको
मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे माजी नगरसेवकांच्या हस्ते किंवा राजकारण्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येऊ नये. कोणी असे उदघाटन केले तर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करावी, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी १ जूनपासून नोंदणी
महापालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र तरीही अनेक विकासकामांची उदघाटने राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केली जातात, विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागते. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.