लोकग्राम रेल्वेवरील नविन पादचारी पुल बांधण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जागेची निश्चिती

Hits: 0

कल्याण दि.०६ :- कल्याण पूर्वेतील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लोकग्राम पुलाची रुंदी सहा मीटर असावी तसेच त्यावर शेड उभारली जावी, अशी मागणी कल्याणचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या मागणीला रेल्वे आणि कंडोंमपा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून सध्या उभ्या असलेल्या पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधण्याचे काम जलद गतीने केले जाईल असे आश्वासनही रेल्वे आणि कंडोंमपा अधिकाऱ्यांनी दिले. सोमवारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापौर विनिता राणे तसेच रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक लोलगे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी तरुण जुनेजा यांच्यासह प्रत्यक्ष पाहणी केली. लोकग्राम पुलाचे काम तातडीने व्हावे यासाठी डॉ. शिंदे अनेक महिन्यांनपासून प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा :- महाआघाडीत फुट हजारो कार्यकर्त्यांचा रुख मनसेकडे

लोकग्राम पुलाला समांतर पूल उभा करून तो सिद्धार्थनगर स्कायवॉकला जोडला जावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. 9 सप्टेंबर 2019 रोजी रेल्वेचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक संजय कुमार जैन यांच्याबरोबर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची या विषयासंदर्भात पहिल्यांदा भेट घेतली होती. त्यानंतर या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला आहे. या पुलाचा खर्च कोण करणार ? असा प्रश्न असल्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये या संदर्भात पत्रव्यवहार करुन कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांना या पुलाचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात यावा, अशी मागणी केली होती.

हेही वाचा :- Ulhasnagar ; भाजप नगरसेविकेच्या पतीने मागितली १ कोटीची खंडणी

त्यानुसार या पुलासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 39 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीही मिळाली आहे. मात्र कल्याण रेल्वे रिमॉडेलिंगचा आराखडा तयार करण्यात आला आहे; त्यामुळे लोकग्राम पुलाला समांतर पुल तयार करण्याच्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आराखड्यात अडचणी येऊ शकतात. पालिकेच्या या आराखड्याला प्रशासनाकडून मंजुरी मिळण्यास विलंब लागू शकतो, ही बाब लक्षात घेता सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे अधिकारी आणि कंडोंमपा अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली सध्या अस्तित्वात असलेल्या पुलाच्या जागेवर नवीन पुलाचे जागा निश्चित केली तसेच काम रेल्वे आणि कंडोंमपा प्रशासनाने सुरू करावे, असा आग्रह केला.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवली शहरात मंगळवारी पाणी नाही

राइट (RITES) या संस्थेच्या माध्यमातून रेल्वे आणि कंडोंमपा संयुक्तरित्या या पुलाचे काम करणार आहे. या पुलाची 6 मी. रूंदी आणि लांबी 320 मीटर इतकी असणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, स्थायी समितीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे, गटनेते दशरथ घाडीगांवकर, विश्वनाथ राणे, नवीन गवळी, रेल्वेचे वरिष्ठ अधिष्ठाता लोलगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट संबधित अधिकारी तरुण जुनेजा, कुलकर्णी, शहर अभियंता सपना कोळी, तसेच कल्याण यार्ड रिमॉडलिंग संबधित अधिकारी, स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.