भारतीय हॅकर्सचा पाकिस्तानवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राइक’, २०० हून अधिक वेबसाईट्स हॅक

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामात दहशतवादी हल्ला केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानला सर्वच स्तरांवर कोंडीत पकडण्यास सुरूवात केली असतानाच पाकिस्तानी कलाकारांनाही भारत बंदी केली आहे. आता भारतीय हॅकर्सनीही पाकवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. यामध्ये पाकमधील 200 हून अधिक वेबसाईट हॅक केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पाकिस्तान सरकारच्या काही वेबसाईट्सचाही समावेश आहे.

हेही वाचा :-जनतेची किंवा कोणत्याही संघटनेची मागणी नसताना उरण मध्ये उभारले जात आहे शिवस्मारक

पाकिस्तानवर झालेला हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सचाही समावेश आहे. हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर हॅकर्सने पोस्ट केले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email