बापू नाडकर्णी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली क्रिकेटला लोकप्रियतेचे वलय देणारा महान खेळाडू गमावला : अजित पवार
मुंबई, दि.१८ :- ‘निर्धाव’ षटकांचे बादशहा ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दु:ख व्यक्त केले असून भारतीय क्रिकेटला लोकप्रियतेचे वलय मिळवून देणारा महान खेळाडू आपण आज गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. भारतीय क्रिकेटला आज लाभलेली लोकप्रियता आणि वलय हे बापू नाडकर्णी साहेबांसारख्या खेळाडूंच्या परिश्रमाचे फळ आहे.
हेही वाचा :- Dombivali ; पतंगाचा मांजा ठरला पक्षांसाठी कर्दनकाळ धारदार मांज्यामुळे घुबड रक्तबंबाळ
१९६४ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेल्या गोलंदाजीचं, ३२ षटकं २७ निर्धाव 5 धावा हे पृथ:करण त्यांची महानता सांगणार आहे. या २७ निर्धाव षटकांपैकी २३ सलग होती. हा विक्रम आजही कायमअसणं हे खुप काही सांगून जातं. बापू नाडकर्णी साहेबांनी अनेक खेळाडू घडवले तसेच अनेकांना प्रेरणा दिली. भारतीय क्रिकेट जगत त्यांना सदैव स्मरणात ठेवील, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Hits: 1