उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा
मुंबई दि.१३ :- पुण्यासह, राज्याच्या कुठल्याही भागातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी अडून राहणार नाहीत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
मध्य-कोकण रेल्वेच्या आणखी चार गाड्यांना प्रत्येकी दोन आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे
विकासप्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य आणि केंद्र शासनाची मंजूरी मिळविणे, निविदा प्रक्रिया गतिमान करणे, विकासकामांच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटविणे, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.