केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघातर्फे निदर्शने
नवी दिल्ली दि.१८ :- केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारतीय मजदूर संघातर्फे गुरुवारी जंतरमंतर येथे निदर्शने करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक उपक्रमातील कंपन्या आणि सरकारी ऊद्योगातील खासगीकरण थांबवा, आजारी उद्योगांचे पुनर्जीवन करा .सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे एकत्रीकरण करू नका आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सार्वजनिक क्षेत्रातील ऊद्योगांची सद्यस्थीती आणि कामगारांच्या विविध समस्या या बाबतचे सविस्तर निवेदनही केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अवजड ऊद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री महीद्रनाथ पांडे यांना सादर करण्यात आले.
शिष्टमंडळात राष्ट्रीय महामंत्री रविंद्र हिमते, एस. मल्लेशम, गिरीश आर्या, एम पी सिंह, अशोक शुल्का आदींचा समावेश होता. दरम्यान या आंदोलनात महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील ऊद्योगातील संरक्षण, बॅंका, आयुर्विमा महामंडळ, रेल्वे, ऊद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सचिन मेंगाळे यांनी दिली.