कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी आणण्याची पक्षीमित्रांची मागणी…

डोंबिवली – पतंगबाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व चायनीज मांजामुळे यापूर्वी अनेकांना प्राण गमवावे लागले. शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले. मकरसंक्रांतीचे वेध लागले, की आकाशात पतंग उडविण्यासाठी ठिकठिकाणी मुलांमध्ये स्पर्धा रंगते. पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला जातो; मात्र या खेळात पक्ष्यांच्या जीवाशीही खेळ खेळला जातो. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांज्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होत असल्याची खंत पक्षिप्रेमींनी व्यक्त केली आहे. तेव्हा छंद जोपासा पण निसर्गाची हानी करू नका असे आवाहन पक्षीमित्र, प्राणीमित्र पॉझ संघटनेचे संस्थापक निलेश भणगे यांनी केले आहे.

हेही वाचा :- प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 26 डिसेंबर 2018 पर्यंत 33.66 कोटी खाती

गेल्या वर्षी घुबडा शिवाय तीन दिवसात १ वटवाघुळ, २ कबुतर जखमी अवस्थेत सापडले असून त्याच्यावर उपचार केले होते. 8 ते 12 जानेवारी या दरम्यान पक्षी जखमी होण्याचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पतंग उडविण्याच्या नादात जैव विविधतेला त्रास होणार नाही,  अशा पध्दतीने सण साजरे करावे असे आवाहन  भणगे यांनी केले आहे. तसेच जखमी पक्षी आढळल्यास  मदतीसाठी  9820161114 / 9920777536 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email